वटार : श्री शक्ती शिक्षण संस्था नाशिक संचिलत,डिव्हाईन इंग्लिश मेडीयम स्कूल,सटाणा येथे झालेल्या दोन दिवसीय बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के.बी.के सनराईज स्कुल किकवारी च्या विद्यार्थ्यांना 1 ली ते 5 वी (प्राथमिक विभागातील) द्वितीय क्र मांकाचे पारितोषिक पटकावले.विज्ञान प्रदर्शनातील प्रमुख विषय असलेल्या शाश्वत विकासासाठी विज्ञान आण ितंत्रज्ञान अंतर्गत शाश्वत कृषी या उपविषय अन्वय बागलाण तलुक्यातील आधुनिक द्राक्ष शेती या विषयाचे उपकरण शाळेतील विद्यार्थी कार्तिक आहिरे, कौशल खैरनार, कार्तिकी काकुळते, रिया काकुळते या विद्यार्थ्यांनी आधुनिक द्राक्ष शेती व वादळी वार्यापासून शेतकर्यांनी आपल्या द्राक्ष बागेची दक्षता कशाप्रकारे घेतली जाऊ शकते या विषयाचे उपकरण या प्रदर्शनात मांडले होते. त्या उपकरणास प्राथमिक विभागात द्वितीय क्र मांक मिळविला त्यावेळी कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रांतअधिकारी विजयकुमार भांगरे, उपशिक्षणाधिकारी के.डी. मोरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे, गटशिक्षणाधिकारी टी.के धोंगडे, विश्वास चंद्रात्रे, विस्ताराधिकारी विजय पगार, कैलास पगार विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष डी. बी. ह्याळीज, तालुक्यातील केंद्रप्रमुख , बागलान तालुका गणति - विज्ञान अध्यापक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.उपकरणासाठी मुख्याध्यापक रोशन भामरे सहशिक्षक धनंजय देवरे शिक्षिका अिश्वनी पाटील,रोहिणी खैरनार पालक प्रकाश आहिरे,मनोहर खैरणार यांनीही प्रयत्न केले.
विज्ञान प्रदर्शनात सनराइज स्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:50 PM