पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड परिसरात सुरू केलेल्या भीमाशंकर कोविड केअर सेंटरला नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. सचिन पाटील यांनी भेट देत रुग्णांची पाहणी केली.
याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवत दिलासा दिला, तर या कोरोनाच्या महामारीतून आम्ही लवकर बरे होऊ, तुमच्या या भेटीमुळे आम्हाला नवचैतन्य आणि नवीन ऊर्जा मिळाली असून, या कोरोनाच्या लढाईत आम्ही यशस्वी होऊन घरी परतणार असल्याचे मत यावेळी रुग्णांनी व्यक्त केले. याप्रसंगी गोरगरिबांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड केअर सेंटरबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आमदार दिलीप बनकर यांचे कौतुकही केले. तसेच ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी स्वखर्चाने परदेशातून निफाड तालुका व कोविड सेंटरसाठी आणण्यात आलेले इलेक्ट्रिक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे उद्घाटन करून पाहणी केली.याप्रसंगी विभागीय पोलीस उपाधीक्षक अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे, उमेश जैन, आदी उपस्थित होते.