शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

अनुत्तीर्णांसाठी १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:29 AM

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांना विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी संपली असली तरी विद्यार्थ्यांना अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.पुरवणी परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यात नियमित अंतिम मुदत २४ जून व विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत २७ जूनला संपुष्टात आली असून, अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत सोमवार, दि. १ जुलै रोजी संपली आहे. आता विद्यार्थ्यांना विशेष अतिविलंब शुल्कासह ८ ते १२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिदिन १०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार असून, त्यानंतरही अतिविशेष अतिविलंब शुल्कासह थेट परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु त्यासाठी प्र्रतिदिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिक