सातपूर : डॉक्टरांना परस्पर बेकायदेशीरपणे कमी भावात होलसेल विक्रेते औषध पुरवठा करीत असल्याने संतप्त झालेल्या मेडिकलचालकांच्या रिटेल केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दुश्यंत भामरे यांची भेट घेत होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.शहरातील विविध डॉक्टरांना होलसेलधारकांकडून कमी भावात सर्रास औषध विक्री केली जात आहे. यामुळे उच्च शिक्षण घेत लाखो रुपये खर्च करून दुकान टाकणाऱ्या मेडिकलधारकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. वर्षभरापूर्वी रिटेल केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने डॉक्टरांना होणारा औषध पुरवठा बेकायदेशीर कसा आहे याबाबत सविस्तर माहिती दिली होती. या होलसेल विक्रेत्यांना एफडीए कार्यालयाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनंजय खाडगीर यांनी केला आहे. दरम्यान, सोमवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दुश्यंत भामरे यांची भेट घेतली. शहरातील डॉक्टरांना बेकायदेशिररीत्या औषध पुरवठा करणाºया होलसेल डिस्ट्रिब्युटर आणि एजन्सीवर कारवाईची मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास रिटेल केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे एफडीए कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनंजय खाडगीर, विजय गायके, अतुल जळके, उदय इघे, प्रियदत्त गोडसे, नितीन उगले, विजय पाटील, संजय शिंदे, उमेश सोनजे आदी उपस्थित होते.
होलसेल विक्रेत्यांकडून औषध पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:26 PM
डॉक्टरांना परस्पर बेकायदेशीरपणे कमी भावात होलसेल विक्रेते औषध पुरवठा करीत असल्याने संतप्त झालेल्या मेडिकलचालकांच्या रिटेल केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दुश्यंत भामरे यांची भेट घेत होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
ठळक मुद्देकेमिस्ट असो.चा विरोध : अन्न व औषध प्रशासनास निवेदन