नाशिक : पावसाळ्यात अतिदुर्गम भागात संपर्क तुटणाऱ्या भागातील अंगणवाड्यांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याबाबतचे नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे, असे आदेश महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश डोखळे यांनी विभागाला दिले. महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक शोभा डोखळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत पावसाळ्यापूर्वी घ्यावयाच्या दक्षताबाबत आढावा घेण्यात आला. त्यात पावसाळ्यापूर्वी अंगणवाडी इमारतींची किरकोळ दुरुस्तीची कामे असल्यास ती करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना कळवून ती दुरुस्ती करून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना डोखळे यांनी केली. तसेच ज्या अंगणवाड्या अतिदुर्गम भागात आहेत, ज्या अंगणवाड्यांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो त्या अंगणवाड्यांना पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात अंगणवाडी केंद्रातील बालकांचे आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक सुविधाबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात दूषित पाण्यापासून आजार व साथरोग होऊ नये यासाठी पाणी शुद्धीकरणासाठी मेडिक्लोर औषधांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत करण्यात यावा, अशा सूचना बैठकीत समिती सदस्यांनी केली. जिल्'ात बालकांच्या लसीकरणाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले असून, आरोग्य तपासणीचे काम ९५ टक्केपूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सुकन्या योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंतच्या मुलींच्या जन्माची माहितीचे सर्वेक्षण करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती शोभा डोखळे यांनी दिले. बैठकीस सदस्य सुनीता अहेर, शीला गवारे, सुरेखा गोेधडे, सीमा बस्ते, सोनाली पवार, सुरेखा जिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अतिदुर्गम भागात पोषण आहाराचा करा पुरवठा
By admin | Published: June 20, 2015 1:44 AM