सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे जनलोकपाल व लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसले आहे. त्यांच्या आंदोलनाला येथील भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदनाद्वारे केली आहे. जोपर्यंत सरकार अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरूच राहणार आहे. हजारे यांच्या आमरण उपोषण सत्याग्रह आंदोलनात सक्रीय सहभाग घेवून जनलोकपाल विधयेकाची अंमलबजावणी करण्यासाठी जनशक्तीचा दबाव वाढविणार आहे. या आधीचे आंदोलने यशस्वी केले तसेच हे आंदोलनही संघटना यशस्वी करणार आहे. तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले जाणार असून, अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करू असे निवेदनात म्हटले आहे.
सिन्नर येथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 5:52 PM