सिन्नर : अपघात, किरकोळ आजार किंवा अन्य कारणास्तव मयत झालेल्या कामगारांच्या पश्चात त्यांच्या पाल्यांची आर्थिक अडचणींअभावी होणारी शैक्षणिक परवड थांबविण्यासाठी २५ चिमुरड्यांना प्रत्येकी अडीच हजारांची मदत देत त्यांच्या आघातावर मायेची पाखरण करण्याचा उपक्रम कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. संजीवनीनगर येथील महादेव कॉलनीत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योजक किशोर राठी, पहिलवान अशोक सोनवणे, उपाध्यक्ष नवनाथ सोबले, माणिकराव मासाळ, आलोकजी दास, केशवराव आहेर, संतोष गोजरे, संदीप प्रसाद आदी उपस्थित होते. पितृछत्र हरपलेल्या २५ कामगार पाल्यांना प्रत्येकी अडीच हजारांची आर्थिक मदत दिली, कामगारांच्या कुटुंबीयांची मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली. मयत कामगारांच्या मुलांना मदत देण्यासाठी अनिल सरवार, उद्योजक किशोर राठी, स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे, अशोक सोनवने, उपाध्यक्ष नवनाथ सोबले, माणिकराव मासाळ, आलोकजी दास, केशवराव आहेर, संतोष गोजरे, संदीप प्रसाद यांनी आर्थिक योगदान दिले. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाने बंदी आणल्याने कामगार शक्ती फाउंडेशनने पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून कामगारांच्या पत्नींना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्याची नावनोंदणी कार्यक्र मात करण्यात आली. प्रास्ताविक किरण भोसले यांनी केले. सूत्रसंचालन किरण भावसार यांनी केले. फाउंडेशनचे सरचिटणीस रवींद्र गिरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संतोष नवले, कोमल धांड, बाबूराव धुळे, बाळासाहेब घोटेकर, राजेंद्र खैरनार, सुभाष मोकळ, संजय सरवार, कारभारी देवकर, विकी मोरे, पांडू वैद्य, उल्हास सरवार, नवनाथ सरवार, सुभाष मोकळ, पुनीत सोनवणे, संकेत राणे, आकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
चिमुकल्यांना आधार : सिन्नरच्या कामगार शक्ती फाउण्डेशनचा उपक्रम; शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी अडीच हजारांची मदत पितृछत्र हरपलेल्या २५ कामगारांच्या पाल्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:17 AM
सिन्नर : अपघात, आजार किंवा अन्य कारणास्तव मयत कामगारांच्या पश्चात त्यांच्या पाल्यांची आर्थिक अडचणींअभावी होणारी शैक्षणिक परवड थांबविण्यासाठी २५ चिमुरड्यांना प्रत्येकी अडीच हजारांची मदत देत त्यांच्या आघातावर मायेची पाखरण करण्याचा उपक्रम कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला.
ठळक मुद्देकामगारांच्या कुटुंबीयांची मोफत नेत्र चिकित्साप्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाने बंदी