नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रा अर्जुन कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली दि.१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नाशिक जिल्ह्यात शेतकरीविरोधी कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी या कायद्याला विरोध दर्शवला पाहिजे असे आवाहन केले. जिल्ह्यातील प्रामुख्याने येवला, मालेगाव, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, जव्हार, मोखाडा, नाशिक शहर, दिंडोरी या भागात स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली, यातून प्रत्यक्ष स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेले एकूण २१ हजार शेतकरी नागरिक असून त्यांनी या शेतकरीविरोधी कायद्याला विरोध केलेला आहे. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. गणेश देवी यांच्या आवाहनातून राबवलेली स्वाक्षरी मोहीम यातून मिळालेल्या स्वाक्षरी पाठिंबाचे पत्र तसेच निवेदन येवला तहसीलदार प्रमोद हिले यांनी शेतकरी ज्या ठिकाणी बसले होते तेथे येऊन निवेदनाचा स्वीकार केला. याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे अवघा शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे सांगत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कारभार ठप्प होऊन शेतकरी नागवला जाणार असल्यामुळे हे तिन्ही काळे कायदे तत्काळ रद्द करावे. केंद्र सरकारने तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली, दि. १६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या स्वाक्षरी मोहिमेचे राष्ट्र सेवा दल छात्रभारती समविचारी संस्था, संघटना यांनी नियोजन केले आहे.
दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; राष्ट्र सेवा दलाची स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:26 AM