शरद हे आपल्या वयोवृद्ध आई-वडील, पत्नी , दोन मुली, मुलगा, मोठा भाऊ भाऊराव त्याचे कुटुंबासह दहिवड येथे एकत्रित राहत होते. दहीवड परीसर हा नेहमीच दुष्काळी असल्यामुळे पाण्याची नेहमी टंचाई, यामुळे शेती व्यवसायावर कुटुंबाची गुजराण करणे जिकीरीचे, यातून मार्ग काढावा यासाठी कमी पाण्यावर येणारे व शाश्वत उत्पन्न देणारे डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय वडील त्र्यंबक आहिरराव यांनी घेतला. त्यासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी त्यांनी बँकेकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले व दीड एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. परंतु मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या डाळींबावर आलेले तेल्या, प्लेग सारखे रोग, तसेच लागोपाठ दोन वर्ष डाळिंबाला मिळालेला कवडीमोल दर यामुळे शरद चिंतित झाला. शरद हा घराचा कारभारी असल्यामुळे सर्व आर्थिक जबाबदारी त्याच्यावर होती. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत वैफल्यग्रस्त झालेल्या शरदने १८ मार्च २०१८ रोजी आपल्या शेतातील डाळिंब बागेत विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली. शरदची पत्नी वैशाली, व त्याच्या तीन मुलांवर आभाळ कोसळले. परंतु एकत्र कुटुंबपद्धतीने त्यांना हात दिला. शरदचा भाऊ भाऊराव,त्याची पत्नी सरस्वती, व धर्मराज, नीलेश, सुवर्णा या मुलांनी उघड्यावर पडलेल्या शरदच्या कुटुंबाला आधार दिला. आजही हे सर्व कुटुंबीय एकत्र नांदत आहे. शासनाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली म्हणून शरदच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
कोट...
माझे चुलते शरद काका यांनी आत्महत्या केल्यानंतर आमचे सर्व कुटुंब उघड्यावर पडले. कुटुंबाला आधार देण्यासाठी शिक्षण अर्ध्यावर सोडून देत शेती व्यवसाय सुरू केला. पाण्याअभावी, तसेच शेतीमालाच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे शेती शाश्वत राहिली नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. देना बँकेचे कर्ज व व्याज सहा लाखांवर गेले आहे. इच्छा असूनही कर्जफेड करणे अशक्य झाल्यामुळे कर्जमाफी मिळावी.
_ नीलेश भाऊराव अहीरराव ( पुतण्या )
-०९ नीलेश अहीरराव
090921\09nsk_27_09092021_13.jpg
-०९ निलेश अहीरराव