नाशिक : विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त्यांचे स्वागत करून त्यांच्या पायी आंदोलनास पाठींबा देण्यात आला. विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार अनुदान मिळावे यासाठी नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौकातून अन्यत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालयापर्यंत पायी प्रवास आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्या समवेत औरंगाबाद येथून वंसत पानसरे, अनिश कुरेशी , अमोल निकम, कमलेश राजपूत आदी शिक्षक या पदयात्रेत सहभागी झाले असून बारा दिवसांचा प्रवास करून त्यांची पदयात्रा शुक्रवारी नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकमध्ये मुक्कामानंतर त्यांची पदयात्रा पुन्हा मुबईच्या दिशेने मार्गस्थ झाली असून येथील प्रा. करतारसिंह ठाकूर, निलेश गांगुर्डे व संस्थाचालक प्रतिनिधी विजय काळे आदींनीही या पदयात्रेत सहभाग घेत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. दरम्यान, विना अनुदानित शिक्षक संघास संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, बापू मूरकुटे,राजेंद्र शेळके, विकी ढोले, राहुल तिडके लकी बाविस्कर, गणेश सहाणे, प्रथमेश पाटील, सनी ठाकरे, भैया सैंदाणे, संविधान गायकवाड, योगेश कापसे, राहुल लोखंडे, किरण निकम ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते.
खैरे सरांच्या पदयात्रेस संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा ; औरंगाबाद ते मंत्रालय आंदोलनाचा तेरावा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:22 PM
विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त्यांचे स्वागत करून त्यांच्या पायी आंदोलनास पाठींबा देण्यात आला.
ठळक मुद्दे गजानन खैरे यांची औरंगाबाद येथून अन्यत्याग करून पदयात्रा शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार अनुदानाची मागणी औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास