कळवण-राज्यातील विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला शिवसेनेसह विद्यार्थी संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे. सलग सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.प्राध्यापकांच्या संप व धरणे आंदोलनाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मागण्यांबाबत माहीती घेत पाठिंबा दर्शविला. मुख्यमंत्र्यांनी प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी मागणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी यावेळी केली. प्राध्यापक भरती तातडीने करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन तत्व लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांतील प्राध्यापक त्यात सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्राध्यापकांनी केला आहे. या संपामुळे महाविद्यालयांतील अध्यापनाची प्रकिया थांबली आहे. एमफुक्टो संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने परीक्षेपूर्वी अभ्यासक्र म पूर्ण होण्यात अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) संघटनेचे कळवण तालुकाध्यक्ष प्रा. एस एम पगार यांच्या नेतृत्वाखाली प्रा राजेंद्र कापडे, प्रा.निंबा कोठावदे, प्रा. बी. एस. पगार, प्रा. एस. जे. पवार, प्रा आर. बी. आहेर, प्रा. पी. व्ही. नंदनवरे, प्रा. श्रीमती यु. के. पवार, प्रा. श्रीमती एम. व्ही. बोरसे, प्रा श्रीमती एम. बी. घोडके, प्रा. मिलिंद वाघ आदी संपात सहभागी झाले आहेत.विद्यार्थी संघटनांचा पाठींबाप्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने २५ सप्टेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात मानूर(कळवण) येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयील प्राध्यापक सहभागी झाले असून प्राध्यापकांंच्या संपाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय बोरसे, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष निखिल बोरसे यांनी पाठिंबा दिला आहे.
प्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 4:22 PM
शिवसेनेचे समर्थन : मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेपाची मागणी
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी मागणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी यावेळी केली.