गरुडेश्वर येथे ऊर्जा ग्रुपच्या महिला सदस्या जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या निमित्ताने गरीब गरजूंना ब्लॅंकेट वाटप करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरुडेश्वर येथे आल्या होत्या. यावेळी शाळेसाठी काहीतरी मदत व्हावी या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद परदेशी व ज्ञानेश्वर बांगर यांनी ऊर्जा फाउंडेशनचे पदाधिकारी यांना सदर ब्लॅंकेट वाटप कार्यक्रमप्रसंगी गरुडेश्वर येथील शाळेतील मोडकळीस आलेल्या वर्गखोली, स्वयंपाकगृह, शेड याबद्दल माहिती देऊन प्रत्यक्षात वस्तुस्थिती दाखवली. तसेच मुलांची पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयीबद्दल माहिती दिली. सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऊर्जा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने इंजिनिअर आणि कारागीर बोलवून सदर काम करण्याच्या संदर्भात चर्चा केली. चर्चेनंतर पंधरा दिवसांत कामाला सुरुवात करण्यात येऊन सदर वर्गखोल्यांचे व स्वयंपाकगृहाच्या शेडचे बांधकाम, प्लास्टर, पत्रे दुरुस्ती, वर्गाला आतून घोटाई, नवीन दरवाजे, रंगकाम, विजेची सोय तसेच वर्गात मुलांना बसण्यासाठी लाकडी बाके, कपाट, संगणक कक्ष आदी कामे करत शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. एक महत्त्वपूर्ण असे काम ऊर्जा ग्रुपच्या माध्यमातून गरुडेश्वर शाळेत घडून आल्यामुळे नागरिकांच्या व शिक्षकवृंदांच्या वतीने ऊर्जा फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. याकामी शिक्षक ज्ञानेश्वर बांगर, प्रमोद परदेशी, पवार, कदम, गांगुर्डे, सोळुंके, श्रीमती वाघ, गभाले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरामण वारघडे आदींचे सहकार्य लाभले.
कोट...
ऊर्जा फाउंडेशन मुंबईच्या वतीने व शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर बांगर यांच्या प्रयत्नाने आमच्या गावातील शाळेत खूप दिवसांपासून मोडकळीस आलेली वर्गखोली व स्वयंपाकगृह याची दुरुस्ती करून महत्त्वाचे काम मार्गी लागले.
- हिरामण वारघडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
फोटो - २६ गरुडेश्वर
गरुडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ करताना शिक्षक ज्ञानेश्वर बांगर, प्रमोद परदेशी, हिरामण वारघडे आदी.
260721\26nsk_15_26072021_13.jpg
गरूडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी करत श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ करतांना शिक्षक ज्ञानेश्वर बांगर, प्रमोद परदेशी, हिरामण वारघडे आदी.