मालेगाव - बॉम्बस्फोटप्रकरणी उच्च न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांना दिलासा देण्यास नकार दिला. याप्रकरणी आरोप निश्चीत करण्याची प्रकिया सुरू आहे. त्यास, स्थगिती देण्याची मागणी कर्नल पुरोहित यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे बुधवार 05 ऑगस्टपासून आरोप निश्चिती प्रकियेला सुरुवात होणार आहे.
मालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 80 जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून प्रज्ञा साध्वी, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली होती. याप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वा यांना जामीन मिळाला आहे. मात्र, याबाबत आरोप निश्चिती प्रकियेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे ही आरोप निश्चिती प्रकिया थांबवावी, अशी मागणी कर्नल पुरोहित यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यास उच्च न्यायालयाच्या खंडपीठातील न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर स्थगिती दिली आहे.