नाशिक : महागाई बद्दल बोलणार्या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापार्यांवर अचानक धाडी टाकून शेतकर्यांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चातून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी दिला.‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्र मानिमित्त मविप्र संस्थेच्या अॅड.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्र संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे उपस्थित होते. जीएसटी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी धोरणांविषयी त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर टिका केली. खा.सुळे म्हणाल्या, की कोणत्याही देशात २८ टक्के कर दालला जात नाही. जीएसटी लागू करण्यापूर्वी करदात्यांना साधारणत: वर्षभर अवधी देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आम्ही केली होती. मात्र, निर्णय घेताना परिणामांची मिमांसा न करणाºया सरकाराने आता यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. कर्जमाफीचा अर्ज चुकला की फौजदारी, व्यावसायिकांनी जीएसटी नाही भरला की फौजदारी करायची. त्यामुळे या सकारला काम करण्यापेक्षा फौजदारी करण्यामध्ये फार रस असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून या सरकारने आता सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करु न त्यांना जाणवणाºया समस्यांवर वेळीच तोडगा काढवा. केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास भविष्यात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही खा.सुळे यांनी याप्रसंगी दिला.
शेतकºयांवर दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर उतरू- सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:33 PM
नाशिक : महागाई बद्दल बोलणार्या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापार्यांवर अचानक धाडी टाकून शेतकर्यांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चातून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा ...
ठळक मुद्देचर्चेतून प्रश्न सोडवा : सरकार शेतकरी विरोधी