नांदूरवैद्य : आळंदी (देवाची) पुणे येथील जोग महाराज शाळेत पार पडलेल्या पंधरा वर्षाखालील ६२ किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र महिला कुस्ती चाचणी स्पर्धेत अहमदनगर, अमरावती, सांगली, पुणे येथील नामवंत महिला कुस्तीपटूंचा पराभव करीत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुपे हिने नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्र मांक पटकावला असून, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.या महिन्यात राजस्थान येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुप्रियाची निवड झाली असून, या स्पर्धेत यापेक्षाही नेत्रदीपक कामगिरी करणार असल्याचे यावेळी तिने बोलून दाखविले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जोरदार सराव चालू असून, आहार आणि सराव याकडे देखील काळजीपूर्वक लक्ष असून, या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावणार असल्याचेही तिने सांगितले. साकूरफाटा येथील गुरु हनुमान आखाड्याचे वस्ताद आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडून सुप्रिया कुस्तीचे डावपेच शिकत असून, भगूर येथील अथनी इंग्लिश मीडिअम स्कूल या शाळेत शिक्षण घेत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष नागनाथ देशमुख आदींसह कुस्ती क्षेत्रातील विविध तज्ज्ञ व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षक प्रवीण सूर्यवंशी, राष्ट्रीय चॅम्पियन बाळू बोडके, संदीप गायकर, विष्णू धोंगडे यांचे सुप्रियाला मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सुप्रिया तुपेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 6:27 PM