संजय पाठक ।नाशिक : विमान प्रवासाचे इच्छुकांचे स्वप्न पुरवण्यासाठी एका आघाडीच्या कंपनीने नाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी दर्शविली खरी; मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकच्या विविध व्यावसायिक संघटनांनी दैनंदिन चाळीस प्रवाशांची हमी देण्याचा सुरत पॅटर्न कंपनीने मांडला आहे. वर्षभराचा विचार केल्यास सुमारे सहा कोटी रुपयांची हमी या कंपनीला द्यावी लागणार असून, यासंदर्भात संघटनाही विचारात पडल्या आहेत. नाशिकच्या सुसज्ज विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी अनेक व्यावसायिक संघटना आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. मात्र, आजवर नाशिक-मुंबई विमानसेवा यशस्वी झालेली नाही, तर दुसरीकडे या मार्गावरील सेवा यशस्वी होणार नसल्याने नाशिक-दिल्ली किंवा नाशिक- बंगळुरू-हैदराबाद अशी सेवा सुरू व्हावी, असे व्यावसायिक संघटनांचे म्हणणे आहे. त्यासाठी नाशिकमधून महिन्यातून आणि वर्षातून किती प्रवासी वेगवेगळ्या शहरांत जातात याचा सर्व्हेदेखील तयार करून देण्यात आलेला आहे. त्याच आधारे एका कंपनीने नाशिकहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. अर्थातच या कंपनीने सरकारी योजनेचा विचार करून हा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार नाशिकहून दिल्लीसाठी १२० आसनी विमान देण्याची कंपनीची तयारी आहे. यातील ६० सीट केंद्र सरकारकडून अनुदानित असणार आहेत. मात्र त्याचवेळी उर्वरित चाळीस सीट म्हणजेच प्रवाशांच्या भाड्याची भरपाई मिळणे आवश्यक आहे. कारण किमान शंभर प्रवासी मिळाले तर ही सेवा तग धरू शकेल, असे विमान कंपनीचे म्हणणे आहे. त्या आधारे कंपनीने नाशिकच्या विविध कंपन्यांकडून चाळीस आसनाची हमी मागितली आहे. ही हमी म्हणजे तिकिटाच्या कूपन्सच्या स्वरूपात किंवा रकमेच्या स्वरूपात हवी असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘स्पाइस जेट’ही नाशिकमधून इच्छुक नाशिक : उडान अंतर्गत प्रादेशिक विमानसेवा पुढील महिन्यात सुरू होण्याची चिन्हे असतानाच स्पाइस जेटही नाशिक ते दिल्ली विमानसेवेसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. या कंपनीने बीड भरल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात मात्र दुजोरा मिळू शकला नाही. केंद्र सरकाने हवाई कंपन्यांसाठी विविध योजना आखल्या असून, देशभरातील वापरातील आणि वापराविना पडून असलेल्या विमानतळावरील धावपट्टीचा वापर व्हावा यासाठी सवलती देऊ केल्या आहेत. त्यातच नाशिकमधून अनेक कंपन्या इच्छुक असल्याचे सांगण्यात येत असून, स्पाइस जेटनेही नाशिक-दिल्ली सेवा देण्याची तयारी केल्याचे एका व्यावसायिकाने टष्ट्वीट केले आणि त्यामुळे चर्चेला उधाण आले. परंतु अधिकृतरीत्या कोणाकडून दुजोरा मिळाला नाही. त्याचबरोबर ज्या व्यावसायिक संघटना विमानसेवेसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांनीही याबाबत अनभिज्ञता दर्शविली, तर देशभरात १४१ हवाई मार्गांसाठी अनेक कंपन्या इच्छुक असून, त्याबाबत पुढील महिन्यात निर्णय होणार असल्याचे काही जाणकारांनी सांगितले, तर स्पाइस जेटच्या संपर्कात असलेल्या नाशिकच्या एका ज्येष्ठ हवाई तज्ज्ञानेदेखील तूर्तास अनेक बाबी संभ्रमात टाकणाºया असल्याने यात तथ्य नसल्याचे स्पाइस जेटच्या एका वरिष्ठ अधिकाºयाच्या हवाल्याने सांगितले.
नाशिकहून दिल्ली विमानसेवेसाठी सुरत पॅटर्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:57 AM
विमान प्रवासाचे इच्छुकांचे स्वप्न पुरवण्यासाठी एका आघाडीच्या कंपनीने नाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी दर्शविली खरी; मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकच्या विविध व्यावसायिक संघटनांनी दैनंदिन चाळीस प्रवाशांची हमी देण्याचा सुरत पॅटर्न कंपनीने मांडला आहे. वर्षभराचा विचार केल्यास सुमारे सहा कोटी रुपयांची हमी या कंपनीला द्यावी लागणार असून, यासंदर्भात संघटनाही विचारात पडल्या आहेत.
ठळक मुद्देनाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी नाशिक-मुंबई विमानसेवा यशस्वी नाही,दिल्लीसाठी १२० आसनी विमान देण्याची कंपनीची तयारी