देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोर्यातील देसराणे येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेली व ग्रामस्थानचे आराध्य दैवत साधकेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . या यात्रे निमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात आल्या होत्या. कुस्ती दंगलीतील विजयी पिहलवानांना वस्तु व रोख स्वरु पात बक्षीसे देण्यात आली.त्रिपुरीपौर्णिमेला साधकेश्वर महाराज यात्रा उत्सव सुरु होतो यात्रेनिमित्ताने जागृत देवस्थान असलेल्या साधकेश्वर (महादेव) मुर्तीची भव्य रथ यात्रा काढण्यात आली होती. पुनद नदी तिरी असलेल्या महादेव मंदिरात साधकेश्वर मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करून रात्री भजन, कीर्तन , अभिषेक विविध धार्मिक कार्यक्र मांनी यात्रेला प्रारंभ झाला.यात्रे निमित्ताने परिसरातील व्यापारी दुकानदार यांनी आपली दुकाने थाटली होती . तालुक्यात त्याप्रमाणे पुनद खोर्यात या यात्रेचे मोठे आकर्षण असल्याने यात्रेला मोठी गर्दी झाली होती. याचप्रमाणे महादेव मंदिरात साधकेश्वर मुर्तीच्या दर्शनासाठी महादेव मंदिरात भविकांनी मोठी गर्दी केली होती.या यात्रेनिमित्ताने हजारो रु पयांची उलाढाल पाहायला मिळाली. यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटिचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, यात्रा पंच, नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले.कळवण पोलिसांनी या यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.
देसराणे येथील साधकेश्वर यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 4:51 PM
देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोर्यातील देसराणे येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेली व ग्रामस्थानचे आराध्य दैवत साधकेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . या यात्रे निमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात आल्या होत्या. कुस्ती दंगलीतील विजयी पिहलवानांना वस्तु व रोख स्वरु पात बक्षीसे देण्यात आली.
ठळक मुद्देअभिषेक विविध धार्मिक कार्यक्र मांनी यात्रेला प्रारंभ झाला.