सुरगाणा : येथे जलशुद्धीकरण केंद्र असूनही सुरगाणा शहरातील नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाणी पुरवठा करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तत्कालीन सुरगाणा ग्रामपंचायत असतांनाच काही वर्षांपूर्वी कार्यालयाजवळ जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्याचा वापर फारच कमी वेळा झाला आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर देखील पावसाळ्यात काही वेळा गढूळ पाणी पुरवठा केला जातो. मागील दोन दिवस पाणी सोडण्यात आले नव्हते. आज पाणी सोडण्यात आले. मात्र ते गढूळ असल्याने महिला वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असून जलशुद्धीकरण केंद्राचा वापर करून स्वच्छ पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी केली जात आहे.
सुरगाणा शहराला गढूळ पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 2:48 PM