शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

सुरगाणा धान्य घोटाळ्यातील सूत्रधार अटकेत आठ दिवस कोठडी : अपहारावर पडणार प्रकाशझोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:51 PM

नाशिक : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व वाहतूक ठेकेदार मोरारजी भिकुलाल मंत्री यांच्यासह तिघांना अखेर सुरगाणा पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्णाची व्याप्ती पाहता न्यायालयाने त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अटक टाळण्यासाठी या तिघा आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून ते राजरोस मोकळे फिरत होते, परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ताच नव्हता.

ठळक मुद्दे सुरगाणा धान्य घोटाळ्यातील सूत्रधार अटकेत आठ दिवस कोठडी : अपहारावर पडणार प्रकाशझोत न्यायालयाने त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले

नाशिक : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व वाहतूक ठेकेदार मोरारजी भिकुलाल मंत्री यांच्यासह तिघांना अखेर सुरगाणा पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्णाची व्याप्ती पाहता न्यायालयाने त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अटक टाळण्यासाठी या तिघा आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून ते राजरोस मोकळे फिरत होते, परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ताच नव्हता.नाशिकरोडचे मे. एस. एन. कंपनीचे भागीदार असलेले मोरारजी भिकुलाल मंत्री यांनी शासकीय धान्य वाहतुकीचा ठेका घेतला त्याकाळी साधारणत: ३० सप्टेंबर ते १९ डिसेंबर २०१४ या अडीच महिन्यांच्या कालावधीत मनमाडच्या अन्न धान्य महामंडळातून सुरगाणा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी मंजूर झालेले रेशनचे धान्य सुरगाणा येथे न पोहोचविता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा गुन्हा २६ जानेवारी २०१५ रोजी सुरगाणा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. वाहतूक ठेकेदार मंत्री यांना त्याचा व्यवस्थापक संजय रामकृष्ण गडाख रा. नाशिकरोड व उगम पारसमल पगारिया रा. सुरगाणा यांनी या धान्य घोटाळ्यात मदत केली होती. या तिघांशिवाय या धान्य घोटाळ्यात एकूण २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांनी संगनमत करून सुमारे सात कोटी, सतरा लाख रुपयांचे धान्य काळ्याबाजारात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती, राज्य सरकारने त्याची दखल घेत विधीमंडळ अधिवेशनातच दोषींवर कडक कारवाईचे तसेच हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून नाशिक जिल्ह्णातील सात तहसीलदारांना निलंबितही केले होते. या गुन्ह्णातील अन्य आरोपींना अटक करून पोलिसांनी तपासही पूर्ण करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असताना मुख्य सूत्रधार मंत्री व त्यांचे दोघे साथीदार मात्र अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले होते. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी थेट सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली व तेथेही फेब्रुवारी २०१७ मध्ये अर्ज फेटाळण्यात आला. परंतु ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत, उलट समाजात राजरोस वावरताना जिल्हा पुरवठा कार्यालयात धान्य वाहतुकीचा ठेका घेताना अनामत भरलेली अडीच कोटी रुपयांची रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी तगादा लावला होता.नाशकातून केली अटकदोन आठवड्यांपूर्वी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या दौºयाच्या वेळी सुरगाणा धान्य घोटाळ्यातील आरोपी न्यायालयाच्या आदेशानंतरही फरार असल्याचे लक्षात आले होते. बापट यांनी त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले तेव्हापासून कळवणचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील आरोपींच्या पाळतीवर होते. मंगळवारी नाशिकमध्येच मंत्री, गडाख व पगारिया या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता, दि. २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ डिसेंबरपर्यंत कोठडीदोन आठवड्यांपूर्वी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले तेव्हापासून कळवणचे पोलीस उपअधीक्षक आरोपींच्या पाळतीवर होते. मंगळवारी नाशिकमध्येच मंत्री, गडाख व पगारिया या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना बुधवारी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता, दि. २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.