नाशिक : ‘मैफील को दो सूर अंजाम, रुह को तेरी किया सलाम जुबां पे हारुन तेरा नाम, गीत भरी यादो की शाम...’ अशा बहारदार शायरीने सुरुवात झालेली मैफल सदाबहार जुन्या हिंदी गीतांनी उत्तररोत्तर रंगली.निमित्त होते, दिवंगत गायक व गझलकार हारुन बागवान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजलीपर मैफलीचे. सार्वजनिक वाचनालय व शहरातील कलावंत मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) परशुराम सायखेडक र सभागृहात ‘गीतोंभरी शाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इतनी शक्ती हमें देना दाता..., या गीताने मैफलीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर आजा तुझको पुकारे..., जिंदगी का सफर..., झनक झनक तोरी..., बोले रे पपीहरा... या गीतांनी उपस्थित श्रोत्यांची दिलखुलास दाद घेतली. या हिंदी गीतगायनानंतर गायक सिराज मनियार यांनी जगजितसिंग यांची गाजलेली गझल ‘चिठ्ठी ना कोई संदेश’ गायनाने मैफलीत आगळा रंग भरला. मेहंदी हसन यांची रंजीश ही सही..., ही गझल संजय बानुबाकोडे यांनी आपल्या खास शैलीत सादर करून उपस्थितांना मुग्ध केले. प्रशांत तांबट यांनी यमन रागातील शांता शेळके यांची रचना व गायक सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले ‘तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी..., हे भावगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गझल, मराठी गीतगायनानंतर पुन्हा हिंदी गीतांचा सिलसिला आरंभला. यावेळी मोठ्या संख्येने श्रोत्यांनी उपस्थित राहून या आगळ्या-वेगळ्या सांस्कृतिक मैफलीचा मनमुराद आनंद लुटला. निवदेन प्रकाश साळवे, शायर उस्मान पटणी, प्रवीण पोद्दार यांनी केले. नवीन तांबट, राजेश भालेराव (तबला), ध्रुवकु मार तेजाळे (संवादिनी), राजन अग्रवाल, फारुख पिरजादे (ढोलक), सलीम बावा (कोंगो-ढोलक), रवि नागपुरे (आॅक्टोपॅड),सचिन लोखंडे (सिंथेसायजर), जयंत पाटेकर (गिटार) यांनी साथसंगत केली.--या गायकांनी खुलविली मैफलअशोक कटारिया, राघवेंद्र अंकलगी, कैलास काळे, संदीप थाटसिंगार, शुभदा बाम-तांबट, चेतन थाटसिंगार, अशोक जाधव, मेराज, आसावरी डोळे, दीपक लोखंडे, उमेश गायकवाड, रझ्झाक शेख, मधुवंती तांबट आदी गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात मैफल रंगविली.--शायरीने चढला नूरहारुन बागवान यांच्यावर अधारित एकापेक्षा एक सरस शायरीसह राष्टÑीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या करणाºया उर्दू शायरीची अधूनमधून होणाºया उधळणीने मैफलीला वेगळाच नूर चढला. जुने नाशिकमधील बहुतांश शायरांनी यावेळी त्यांच्या रचना सादर केल्या.
नाशिकच्या कलावंताला सुरमयी आदरांजली : जुबां पे हारुन तेरा नाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 9:44 PM
दिवंगत गायक व गझलकार हारुन बागवान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदरांजलीपर मैफलीचे. सार्वजनिक वाचनालय व शहरातील कलावंत मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) परशुराम सायखेडक र सभागृहात ‘गीतोंभरी शाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देजिंदगी का सफर..., झनक झनक तोरी..., बोले रे पपीहरा... या गीतांनी उपस्थित श्रोत्यांची दिलखुलास दाद ‘चिठ्ठी ना कोई संदेश’ गझलने मैफलीत आगळा रंग भरला.शायरीने चढला नूर