पेठ : तालुक्यातील गोंदे, भायगाव, कोहोर, निरगुडे भागात झालेल्या भूकंपानंतर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या भागात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.मंगळवारी सकाळी या भागाला भूकंपाचा धक्का जाणवला. गत १० वर्षापासून परिसरात जवळपास ८२ वेळा भूकंपाचे धक्के बसले असूनही कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली. गोंदे हे भूकंपाचे केंद्र असताना या ठिकाणी भूकंपमापन यंत्र बसविण्याची मागणी प्रलंबित आहे, याकडेही ग्रामस्थांनी खासदारांचे लक्ष वेधले. याप्रसंगी डॉ. प्रशांत भदाणे, भागवत पाटील, चंद्रकांत खंबाईत, रघुनाथ चौधरी गणपत चौधरी, यशवंत खंबाईत, संपत भोंडवे यांच्यासह सरपंच, पोलीसपाटील उपस्थित होते.
हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:58 AM