चांदोरी : निफाड तालुक्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातीचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे.बार्टीकडून नेहमीच विविध सामाजिक कार्य केले जातात. जेणे करून समाजातील वंचीत दुर्लक्षित घटक समाजाचा हिस्सा बनून त्यांना प्रवाहात येण्यास मदत होते. त्याचाच एक भाग एस. सी. प्रवर्गातील ५९ जातींचा गावनिहाय सर्वे होय. जेणेकरून अश्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे की ज्याला सरकारी कुठल्याही योजनेची माहिती नाही किंवा लाभ देखील मिळत नाही. तसेच बार्टीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे आॅनलाइन अभ्यास वर्ग घेतले जात आहे. समतादूतांमार्फत हे काम प्रत्येक तालुक्यात केले जात आहे.निफाड तालुक्यात समतादूत प्रत्येक गावात जाऊन अशा लोकांची माहिती घेत आहे. त्यात ११९ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ६७ गावांची जातनिहाय माहिती मिळवली असून त्या कामात गावचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आदींची मदत होत आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत काम करत आहेत.
निफाड तालुक्यात बार्टीच्या माध्यमातून सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 7:02 PM
चांदोरी : निफाड तालुक्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातीचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे बार्टीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे आॅनलाइन अभ्यास वर्ग