शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 6:53 PM

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करून नाशिक व दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश व वीज यांची व्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील अंबडच्या वेअर हाउस येथे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार असल्याने अंबड वेअर हाउस येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करून नाशिक व दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश व वीज यांची व्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच मतमोजणीच्या दिवशी मीडिया कक्षासाठी निश्चित केलेल्या जागेचीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड येथील सुरक्षा अधिका-यांना दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, अरविंद अंतुर्लीकर, कुंदन सोनवणे, प्रकाश थविल, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक