शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सोयगावातील बच्छाव सर्कल तीन महिन्यांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 10:44 PM

सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

ठळक मुद्देमहिना उलटत आला तरी पथदीप बसले नाहीत.

सोयगाव : सोयगावातील बच्छाव सर्कल गेल्या तीन महिन्यांपासून अंधारात असून पथदीप बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा विद्युत विभागाने वीजपुरवठा सुरू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.या भागात प्रचंड रहदारी असते, चोवीस तास लहान,मोठ्या,अवजड वाहनांची ये-जा ह्याच मार्गाने चालू असते. मागील तीन महिन्यांपासून येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री येथून वाहतूक करणे जोखमीचे झाले आहे. पथदिव्यांअभावी पादचारी, सायकल चालक एकमेकांवर धडकत आहेत. पंधरा दिवसापूर्वी एका वयोवृद्ध व्यक्तीला सायकल चालकाने मागून धडक दिल्याने त्यांना डोक्याला जखम झाली.

चौकात सर्वत्र मोठेमोठे दगडधोंडे असून रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे. बच्छाव सर्कल दुरूस्ती, सुशोभीकरण व रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरून आहे. भूमिगत गटारीच्या पंधरा फूट खोल चेंबरमध्ये गाय पडली होती. त्यावेळी उपमहापौर आहेर यांनी उद्या लगेच पथदिवे दुरुस्ती करून देतो असे आश्वासन दिले होते.

महिना उलटत आला तरी पथदीप बसले नाहीत. पथदिव्यांअभावी या चौकातून प्रवास करणे अवघड झाले आहे. भूमिगत गटाराचे चेंबर चक्क माती टाकून बुजवण्यात आले आहे. मालेगाव महानगरपालिका नागरी सुरक्षितता याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. जागरूक नगरसेवकांचा अभाव,तत्पर प्रशासकीय अधिकारी नसल्या कारणाने नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी भरूनही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.महानगरपालिकेत जागृत,नागरिकांच्या समस्या जाणून घेणाऱ्या व सोडवणाऱ्या नगरसेवकांचा अभाव आहे. बच्छाव सर्कलची पूर्णपणे वाट लागली आहे.जनतेतून, होणाऱ्या कामांचे पब्लिक ऑडिट होण्याची मागणी जोर धरत आहे.-पंकज बच्छाव, सोयगावबच्छाव सर्कल अर्थात टेहरे चौफुली विकास हा अति महत्त्वाचा विषय आहे. नागरिक मागील तीन महिन्यांपासून पथदिवे लावण्याची मागणी करत आहेत. स्वतः उपमहापौर यांना येथील परिस्थितीची लोकांनी जाणीव करून दिली आहे. तरी चौफुली अंधारातच आहे.-अमित(सोनू)पाटील.सोयगाव

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज