मालेगाव : गौण खनिज (वाळू) वाहतुकीची बनावट परवाने बनविणे व तहसील आवारातून दंड न भरता ट्रक पळवून नेल्याप्रकरणातील फरार संशयित आरोपी व वाळू ठेकेदार रमेश तुकाराम कटाळे (४४), रा. नाशिक आणि नीलेश सुधाकर पाटील (३८), रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव हे दोघे छावणी पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मालेगाव, मनमाड व नाशिककडे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली होती. यात क्षमतेपेक्षा अधिक व विनापरवाना वाळू वाहतूक करणाºया १० ट्रक पकडून त्या तहसील आवारात उभ्या करण्यात आल्या होत्या. १९ ते २० मार्च २०१८ च्या रात्री ट्रक मालकांनी दंड न भरता तहसील आवारातील ट्रक पळवून नेले होते तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनी ट्रक मालकांनी ट्रक पळवून नेल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी पळवून नेलेल्या १० ट्रक व ५० लाख रुपये किमतीची वाळू जप्त केली होती. तसेच धनराज बबन चौधरी व विजय रमण चांडे, रा. कुंदलगाव, श्रावण पोपट मिसकर, युवराज लक्ष्मण शिंदे, अज्जू म्हातारबुवा शिंदे (तिघे, रा. जळगाव निं.), महेश अशोक सरोदे, रा. भांडी नांदगाव, ज्ञानेश्वर निवृत्ती केसनोर, रा. जळगाव, बळवंत संतोष पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील (दोघे, रा. द्याने, जि. धुळे), लक्ष्मण कारभारी व्हर्गर, रा. नवसारी, ता. नांदगाव या दहा जणांवर यापूर्वी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील वाळू ठेकेदार रमेश कटाळे व नीलेश पाटील फरार होते. त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्याने ८ जुलै रोजी दोघेसंशयित पोलिसांना शरण आले.त्यांना अटक करण्यात आली आहे. कटाळे व पाटील यांची कसून चौकशी केली जात असून, गौण खनिजाचे बनावट परवाने कुठे बनविले, बनावट परवानांच्या आधारावर शासनाचा किती महसूल बुडविला याची चौकशी केली जात असल्याची माहिती छावणीचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिली.गौण खनिज वाहतुकीचा बनावट परवाना खापरखेडा, ता. अमळनेर,जि. जळगाव येथील वाळू लिलाव ठेकेदार रमेश कटाळे यांनी घेतला होता. या ठिकाणच्या वाळूचा उपसा करून गौण खनिज वाहतुकीचा बनावट परवाना बनवून वाळूची मुंबई व इतरत्र वाहतूक केली जात होती. जळगाव येथील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी नीलेश पाटील यांच्या मदतीने ही वाहतूक केली जात होती. याचा भंडाफोड अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केला.
ट्रक पळविणारा वाळू ठेकेदार शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:33 PM
मालेगाव : गौण खनिज (वाळू) वाहतुकीची बनावट परवाने बनविणे व तहसील आवारातून दंड न भरता ट्रक पळवून नेल्याप्रकरणातील फरार संशयित आरोपी व वाळू ठेकेदार रमेश तुकाराम कटाळे (४४), रा. नाशिक आणि नीलेश सुधाकर पाटील (३८), रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव हे दोघे छावणी पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
ठळक मुद्देमालेगाव : दोघांना अटक; पोलीस कोठडी