चांदवड : तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्याचाच भाग म्हणून ज्या घरी शौचालय त्या घरीच सोयरिक असाही एक ठराव चांदवड शहरातील इंद्रायणी कॉलनीतील इंद्रायणी विद्यार्थी जनहित मंचच्या सदस्यांतर्फे तालुक्यातील विविध गावांतील लोकांपुढे स्वच्छता अभियानामार्फत मांडला व बहुतेक गावांतील गावकऱ्यांनी तो संमत केला आहे. लग्न जमविताना गुण जुळवण्यापेक्षा उपवर मुलींच्या माफक अपेक्षांचा विचार करत घरामध्ये शौचालय, पाण्याची उपलब्धता आहे की नाही याचा विचार गावात गावकरी करू लागले आहेत. मुलाच्या घरात शौचालय आहे का, हा विचार लोक करत आहेत. निर्व्यसनी मुलगा, घर, नोकरी यासोबत गरजांच्या दृष्टिकोनातून शौचालयाची निकड उपवर मुलींनाही जाणवू लागली आहे. बºयाच गावांत काही योजनांच्या माध्यमातून घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले आहे; परंतु काहीवेळा तेथे पुरेशी पाण्याची उपलब्धता नसते. त्यातून नव्याने लग्न होऊन आलेल्या मुलीचीकोंडी होते. त्यामुळे घरात पाण्याची तसेच शौचालयाची सोय हवी, ही बºयाच गावांमधील मुलींची अपेक्षा आहे. हा उपक्र म यशस्वी करण्याकरिता दिनेश पूरकर, महेश तांदळे, राहुल कबाडे, सुदर्शन पानसरे, कल्पेश बोरसे, मयूर अग्रवाल, दुर्गेश हिरे, योगेश ठाकरे, सारंग जाधव आणि विद्यार्थी जनहित मंचचे इतर सदस्य काम करत आहेत. या उपक्रमाचे तालुक्यातून स्वागत होत आहे.
ज्या घरी शौचालय त्याच घरी सोयरिक चांदवड : इंद्रायणी विद्यार्थी जनहित मंचचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:12 AM
चांदवड : ज्या घरी शौचालय त्या घरीच सोयरिक असाही एक ठराव चांदवड शहरातील इंद्रायणी कॉलनीतील इंद्रायणी विद्यार्थी जनहित मंचच्या सदस्यांतर्फे तालुक्यातील विविध गावांतील लोकांपुढे स्वच्छता अभियानामार्फत मांडला
ठळक मुद्देमुलाच्या घरात शौचालय आहे का, हा विचार लोक करत आहेतकाहीवेळा तेथे पुरेशी पाण्याची उपलब्धता नसते