डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.येथील ग्रामपंचायतीवर संजय सोनवणे यांच्या जलदुर्गा पॅनलचे वर्चस्व असून, उपसरपंच वैशाली बधान यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंचपदी निवड करण्यासाठी सरपंच जिजाबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी उपसरपंचपदासाठी सुशीलकुमार सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जिजाबाई पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संजय सोनवणे यांच्या जलदुर्गा पॅनलने दहा पैकी सात जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, यावेळी सर्व सदस्यांशी चर्चा करून उपसरपंचपदासाठी सोनवणे यांच्या नावावर सर्वाचे एकमत झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सूर्यवंशी होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे, वैशाली बधान, यशोदाबाई सोनवणे, लताबाई वाघ, वत्सलाबाई पवार, रामदास पवार डोंगर माळी, पद्माबाई सोनवणे, धाकू मोरे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 6:11 PM
डांगसौंदाणे : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुशीलकुमार सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायतीवर संजय सोनवणे यांच्या जलदुर्गा पॅनलचे वर्चस्व