नाशिक : हैदराबाद पोलिसांच्या ताब्यातून हातातील बेडीसह फरार झालेला व नाशिक पोलिसांनी अटक केलेला सराईत गुन्हेगार महमंद मुजीब अफान बिन ऊर्फ सलमान ऊर्फ गोरे मुजीब (२५, रा. शिंगरावस्ती, हैदराबाद) याने गुन्हे शाखेच्या कार्यालयात स्वत:च्या शरीरावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास घडली़हैदराबादमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये संशयित बिन याच्या विरोधात ५४ गुन्हे दाखल असून, त्यास अटक करणाºया पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो बेडीसह फरार झाला होता़ रेल्वेद्वारे नाशिकला आलेल्या बिन याने स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने महिलांच्या सोनसाखळ्या खेचण्याबरोबरच घरफोडीचे ११ गुन्हे केले़ गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली तसेच १६ तोळे सोने व दुचाकी असा सहा लाख रुपयांचा ऐवजही जप्त केला़
संशयित गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:02 AM