शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
6
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
7
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
8
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
9
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
10
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
11
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
12
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
13
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
14
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
15
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
16
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
17
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
18
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
19
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
20
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

फुलेनगरला गोळीबार करणाऱ्या संशयितांची धिंड; दहशत मोडून काढत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 4:14 PM

फुलेनगर परिसरात राहणारे संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात व संदीप अहिरे आदी चौघांनी पूर्ववैमनस्यातून प्रेम दयानंद महाले याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

- संदीप झीरवाळ

पंचवटी : पेठरोड फुलेनगर येथील मुंजाबाबा चौकात दहा दिवसांपूर्वी शनिवारी (दि. ११) हातात धारदार कोयते नाचवून दहशत पसरवून युवकावर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयितांबाबत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी तसेच त्यांच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे यावे, यासाठी मंगळवारी (दि. २१) सायंकाळी पोलिसांनी संशयितांची परिसरातून धिंड काढली.

फुलेनगर परिसरात राहणारे संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, जय खरात व संदीप अहिरे आदी चौघांनी पूर्ववैमनस्यातून प्रेम दयानंद महाले याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महाले हा जीव वाचवून पळाला असताना संशयितांनी गोळीबार केला होता. त्यातील एक गोळी महाले याची आई उषा यांना चाटून गेली, तर दुसरी गोळी पाळीव श्वान टॉमीच्या पायाला लागल्याने महाले याची आई व पाळीव श्वान जखमी झाले. या घटनेनंतर संशयित फरार झाले होते. मात्र, गोळीबाराची घटना परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोधपथकाने जय खरात, संदीप अहिरे, विकी वाघ या तिघांना ग्रामीण भागातून सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त केला असून, संशयितांची फुलेनगर परिसरात दहशत असल्याने त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी व संशयितांविरूद्ध आणखी कोणाच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे यावे, यासाठी मंगळवारी (दि. २१) तिघांची परिसरातून धिंड काढण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितांची असलेली दहशत कमी व्हावी, यासाठी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, रणजित नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांनी संशयित आरोपी खरे, वाघ व अहिरे आदींची फुलेनगर मुंजाबाबा चौक परिसरातून धिंड काढत संशयितांकडून सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास आहे, याबाबत माहिती जमा केली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस