येवला : पालखेड पाटबंधारे विभागाच्या डावा कालवा वितरिका क्रमांक ३६ वरील १३ पाणी वापर सहकारी संस्थांपैकी ७ संस्थांना पाणी मिळावे यासाठी संस्थांच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी गुरु वारी रात्री पालखेड कार्यालयासमोर आंदोलन करत ठिय्या मांडला. वितरिका ३६ ला पाणी देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन माग ेघेण्यात आले. वितारिका क्रमांक ३६ ला पाणी सोडावे या मागणीसाठी सुमारे २०० आक्रमक शेतकºयांनी येवला येथील पालखेड कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. पाणी सोडत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका घेतलेले शेतकरी अधिकच आक्रमक झाले. तहसीलदार नरेश कुमार बहिरम, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी थेट पालखेड अभियंतासह उपअभियंता वैभव भागवत यांच्याशी संपर्क साधत व आंदोलनकर्ते यांच्यात शिष्टाई करत पाणी सोडण्याचे आदेश द्यायला भाग पाडले. अगस्ती मुनी पाणीवापर निमगाव, श्रीकृष्ण पाणीवापर पारेगाव, आदर्श पाणीवापर चिचोंडी, गुरुदत्त पाणीवापर बदापूर, शिवशंकर पाणीवापर नाटेगाव, संत जनार्दन पाणीवापर निमगाव, दत्त दिगंबर पाणीवापर नाटेगाव या संस्था पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे कार्यालयासमोर शामराव मढवई, सचिन आहेर, भाऊसाहेब कांबरे, सुदाम मोरे, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, चंद्रकांत मोरे, सरपंच विठ्ठलराव आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सूर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्री मढवई रात्री उशिरापर्यंत कार्यालयावर आंदोलनाच्या पवित्र्यात उभे होते.
आंदोलन स्थगित : वितरिका ३६ ला पाणी देण्याचे लेखी आश्वासन पालखेडचे पाणी तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 1:27 AM
येवला : पालखेड पाटबंधारे विभागाच्या पाणी वापर सहकारी संस्थांपैकी संस्थांना पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी आंदोलन करत ठिय्या मांडला.
ठळक मुद्देयेवला येथील पालखेड कार्यालयाबाहेर ठिय्यासंस्था पाण्यापासून वंचित आहेत