नाशिक : महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ, आयटक आणि इतर कंत्राटी कर्मचारी संघटनांतर्फे नियोजित नाशिक ते मुंबई लॉँग मार्च प्रशासनाने परवानगी नाकारल्याने नाशिकमध्येच स्थगित करण्यात आला. प्रशासनाने मोर्चाला परवनागी दिलेली नसतानाही पूर्व नियोजनानुसार राज्यभरातून गोल्फक्लब मैदानावर मोर्चेकरी जमू लागल्याने प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधून रोजगार हमी सचिवांशी बुधवारी (दि. २७) बैठक घडवून आणण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर लॉग मार्च स्थगीत करीत असल्याची मोर्चेकऱ्यांच्या नेत्यांनी दिली. कंत्राटी कामगाराचे शासन सेवेत समायोजन, समान काम, समान वेतन, बाह्यस्त्रोत यंत्रणा रद्द करून शासन सेवेत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आस्थापनांवर सामावून घ्यावे आदी मागण्यासाठी कंत्राटी कर्मचारी महासंघ, आयटक आणि इतर कंत्राटी कर्मचारी संघटनांनी काढलेला नाशिक ते मुंबई लाँग मार्च जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळात झालेल्या बैठकीनंतर तूर्तास स्थगीत करण्यात आला. लॉग मार्चला परवानगी नसल्याने पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी व आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक घडवून आणली. यावेळी आंदोलकांनी आम्ही मुख्यमंत्र्यांशिवाय इतर कोणाला भेटणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, जिल्हाधिकाºयांनी आंदोलकांशी चर्चा करून रोजगार हमी सचिवांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचारी संघटनांनी अखेर माघार घेऊन मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नाशिकहून मागील वषार्पासून दोन लॉग मार्च काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न राज्याचा असला तरी लॉग मार्च नाशिकहूनच का काढला जातो, असा हतबल सवाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आंदोलकांना करतानाच यापुढे विनापरवानगी मोर्चा अथवा आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यातचा इशाराही त्यांनी आंदोलकांना दिला आहे. यावेळी पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह आंदोलकांच्या वतीने आयटकचे राज्य सचिव राजू देसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर, राज्य सचीव बाबासाहेब कोकाटे, सहकार्याध्यक्ष सचिन पाटील, अनिल बुचकूल, पारस झांबरे, अरविंद क्षिरसागर आदी उपस्थित होते.
मोर्चेकऱ्यांपेक्षा पोलीसच अधिक प्रशासानाकडून कोणतीही परवानगी नसताना मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी विविध जिल्ह्यांतील कंत्राटी कामगार गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित झाले होते. त्यामुळे याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसरात मोर्चेकऱ्यांपेक्षा पोलीसच अधिक असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यापूर्वी नाशिकहून दोन वेळा निघालेल्या किसान सभेच्या लाँर्ग मार्चच्या अनुभवातून पोलीस प्रशासनाने चांगलाच धडा घेतला असल्याचे शनिवारी दिसून आले. लॉग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणांहून दोनशे ते अडीचशे कंत्राटी कर्मचारी जमलेले असताना पोलीसांनी घटनेवर लक्ष ठेवून संपूर्ण मैदानाचा ताबा घेतल्याने आंदोलक कमी आणि पोलीसच अधिक दिसत होते
जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक पोलीस प्रशासनाने लाँग मार्च न काढण्याबाबत सूचना केल्या. मात्र, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याशी शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. या बैठकीत मोर्चेकऱ्यांना बुधवारी रोजगार हमी सचिवांशी बैठक घडवून आणण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकºयांनी अखेर आंदोलन स्थगित केल्याची माहिती आयटकचे राज्य सचीव राजू देसले यांनी दिली.