तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यात २००० अपात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्षात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी रकमेचा परतावा केला. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेत संबंधितांना विनंतीही केली. तथापि, कोणतीही दाद न देणाऱ्यांवर सक्तीच्या वसुलीचे पाऊल उचलण्यात आले आहे.
रकमेचा परतावा मिळत नसल्याने संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्याबाबत बँकांना पत्र देण्यात आले. पहिल्या टप्प्यात ५, दुसऱ्या टप्प्यात १७ गावातील अपात्र लाभार्थ्यांचे बँक खाते तात्पुरते स्थगित करण्यात आले. वसुली इतकी रक्कम खात्यात असल्यास ती लगेच प्रशासनाकडे वर्ग करून पुन्हा बँक खाते सुरू करण्यात आले. तर रक्कम नसल्यास पुरेशी रक्कम जमा होईपर्यंत खाते स्थगित ठेवण्यात आले. रकमेची पूर्तता झाल्यानंतर ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली.
सिन्नरसह बारागाविपंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, ठाणगाव, नांदूरशिंगोटे, वावी, शहा, पंचाळे, वडांगळी, सोनांबे, डुबेरे आदी २२ गावांतील २०० शेतकऱ्यांचा कारवाईत समावेश आहे. २००० शेतकऱ्यांकडून दोन कोटीहून अधिक रकमेची वसुली करण्याचे उद्दिष्टे होते. तीन महिन्यात ११०८ लाभार्थ्यांकडून १ कोटी १३ लाख ६२ हजार रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत. जिल्ह्यात सिन्नर तालुका वसुलीत अव्वल ठरला आहे.
कोट.....
पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना नोटीस बजावून, प्रत्यक्ष पाठपुराव्यानंतरही लाभार्थी प्रतिसाद देत नाही. त्यामुळे वसुलीसाठी सक्तीचे पाऊल उचलले आहे.
राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नर