नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात १९ सप्टेंबर रोजी दोघा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात कर्मचाºयांचे जबाब व सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या आधारे गणेश सोनवणे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमानुसार सेवेतून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी दिले. जिल्हा परिषदेत १९ सप्टेंबर रोजी कार्यालयात नेहमी उशिराने का येतात याची विचारणा केली असता कनिष्ठ सहायक लिपिक गणेश सोनवणे यांनी कनिष्ठ प्रशासन अधिकाºयांशी भांडण केले होते. इतकेच नाही तर त्यांच्या टेबलजवळ जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. आस्थापना विषयक माहिती उपलब्ध करून न देणे, विना परवानगी धार्मिक कारणास्तव रजेवर निघून जाणे, कनिष्ठ प्रशासन अधिकाºयांशी उद्धटपणे बोलणे या कारणांवरून गणेश सोनवणे यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, निलंबन कालावधीत गणेश सोनवणे यांना पंचायत समिती सुरगाणा हे मुख्यालय देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील मारहाण प्रकरणात एकाचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:26 AM