नाशिक : ज्यांना सेवेत बारा वर्षे पूर्ण झाली किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या होमगाडर््सला नूतनीकरण न देता अपात्र ठरविण्याच्या राज्य शासनाचा निर्णय गृह खात्याने स्थगित केला असून, त्यामुळे राज्यभरातील होमगाडर््सला दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेसातशे होमगाडर््सला पुन्हा सेवा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अवघ्या चारशे रुपयांच्या मानधनावर बंदोबस्तात काम करणाºया होमगाडर््सची गेल्या काही वर्षांपासून ससेहोलपट होत आहे. १३ जुलै २०१० रोजी राज्य सरकारच्या एका पत्राचा आधार घेऊन ज्या होमगाडर््सची बारा वर्षे सेवा झाली आहे किंवा १८ किंवा २२ वर्षे सेवा झाली आहे त्यांना अपात्र ठरविण्यात आले. राज्यभरात ५५ हजार होमगार्ड्स असून, त्यातील बहुतांशी उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील २८०० पैकी ७३० होमगार्ड्सला अपात्र ठरविण्यात आले होते.
होमगार्ड्सला सेवेतून कमी करण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:37 AM