सिन्नर : तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथील सरपंच निवडीला माजी सरपंच गणेश गुरुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ६) सरपंच निवडीची विशेष सभा होऊ शकली नाही. दि. २१ नोव्हेंबरपर्यंत सरपंचपदासाठी निवडणूक घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.खोपडी बुद्रुक ग्रामपंचायतीत आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचे गट सक्रिय आहेत. २०१५ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर बहुमताची जुळवाजुळव करून माजी आमदार कोकाटे गटाचे गणेश गुरुळे सरपंचपदी विराजमान झाले. गेली सव्वातीन वर्षे गुरुळे हे सरपंच म्हणून कार्यरत होते. तथापि, सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामे करीत नाहीत आदी कारणांनी आमदार वाजे समर्थकांनी सरपंच गुरुळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अविश्वास प्रस्ताव सहाविरुद्ध दोन मतांनी मंजूरही झाला. एकूण नऊ सदस्यांपैकी एक सदस्य गैरहजर राहिला होता. दरम्यान, गणेश गुरुळे यांनी अपिल केले होते. त्यात ग्रामपंचायत सदस्य सीमा गुरुळे यांनी जात पडताळणीचे वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असताना तसे केलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कायद्याचा भंग केल्याने त्यांचे पद रद्द होणे अपेक्षित असताना त्यांनी नुकत्याच झालेल्या अविश्वास ठरावावेळी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान केले, हे कायद्याचे उल्लंघन आहे, असा आक्षेप नोंदविण्यात आला होता. तथापि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सीमा गुरुळे यांनी जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र जोडलेले असून, मुदतीत सादर झालेले नसेल तर त्यांच्या अपात्रतेबाबत घोषित झालेले नसल्याने त्यांचा मतदानाचा हक्क डावलता येत नाही, असा निर्वाळा देत गणेश गुरुळे यांचे अपिल फेटाळले होते. सीमा गुरुळे यांचे सदस्यत्व रद्दखोपडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र मांक तीनमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या जागेवर निवडून आलेल्या सदस्य सीमा गुरु ळे यांचे पद जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे माजी आमदार कोकाटे समर्थक गणेश गुरुळे गटाने अविश्वास ठरावाचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे. अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी याबाबत नुकताच निकाल दिला आहे.
खोपडी बुद्रुक सरपंच निवडीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 11:54 PM
सिन्नर : तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथील सरपंच निवडीला माजी सरपंच गणेश गुरुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ६) सरपंच निवडीची विशेष सभा होऊ शकली नाही. दि. २१ नोव्हेंबरपर्यंत सरपंचपदासाठी निवडणूक घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देगुरुळे गटाने अविश्वास ठरावाचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे.