शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

‘कम्पाउंडिंग स्कीम’मध्ये दाखल प्रस्तावांवर संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:15 AM

शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मुदतीत दोन हजार ९३० प्रकरणे दाखल झाली खरी, परंतु नगररचना विभागाने अशा प्रकरणांच्या फाइल स्वीकारताना त्याबाबत कोणत्याही प्रकारची पोच दिलेली नाही.

नाशिक : शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मुदतीत दोन हजार ९३० प्रकरणे दाखल झाली खरी, परंतु नगररचना विभागाने अशा प्रकरणांच्या फाइल स्वीकारताना त्याबाबत कोणत्याही प्रकारची पोच दिलेली नाही. त्यामुळे  हापालिकेनेच कोणत्याही बांधकामाविषयी विचारणा केली तर सदरचे प्रकरण कम्पाउंडिंगमध्ये दाखल केल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याने अकारण कारवाईला सामोरे जावे लागू शकते या भीतीने संबंधित धास्तावले आहेत.  शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करणाऱ्यांसाठी शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कम्पाउंडिंग स्कीम अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तीत जी प्रकरणे बसतील त्यांना नियमित केले जाईल. त्यासाठी नियमानुसार महापालिकेकडे रक्कमही भरावी लागणार आहे. या मुदतीत जे प्रस्ताव दाखल करणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. खुद्द आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसा इशारा दिला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या विकासक तसेच अन्य बांधकाम करणाºयांनी महापालिकेकडे धाव घेतली आणि तातडीने प्रस्ताव दाखल केले.  ३१ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजेनंतर एकही प्रकरण दाखल करून घेतले जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट केल्याने अखेरच्या काही दिवसांत तर झुंबड उडाली होती.  शेकडो फाइली दाखल झाल्यानंतर त्यावर नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागुल यांनी सह्या करून त्या एका कक्षात ठेवण्यात आल्या आहेत.पहिल्या दिवशी सुमारे अडीच हजार फाइली दाखल झाल्याचे सांगणाºया महापालिकेने नंतर मात्र एकूण २९२३ फाइली दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ज्यांनी या फाइली दाखल केल्या, त्या कोणालाही महापालिकेने पोच दिलेली नाही. त्यामुळे फाइलींची संख्या नक्की किती याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत.  महापालिकेच्या एखाद्या अधिकाºयाने याबाबत एखाद्या अनधिकृत बांधकाम करणाºयाला विचारणा केली तर आपल्या बांधकामाचे प्रकरण कम्पाउंडिंग अंतर्गत दाखल असल्याचे सांगितले तरी त्यासाठी पुरावा म्हणून कोणती पोच पावती देणार, असा प्रश्न काही विकासकांनी केला आहे. याही पलीकडे जाऊन, नगररचना विभागातच कोणी गोंधळ घालून फाइली दाखल केल्या तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका