शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

मालेगावी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:25 AM

मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त

मालेगाव : कॅम्पातील प्रसिद्ध डॉक्टर व रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज राजेंद्र भामरे (४०) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.डॉ. मनोज भामरे मूळचे साक्री तालुक्यातील मालपूर येथील रहिवाशी होते. त्यांचा कॅम्पात शकुंतला भवन परिसरात आयुर्वेदिक दवाखाना आहे. डॉ. भामरे हे सोयगावच्या डी. के. पानस्टॉलजवळ तुळजाई कॉलनीत राहत होते. ते बुधवारी रात्री ९ वाजता मराठा दरबारमध्ये रोटरीच्या बैठकीसाठी गेले होते. त्यांना तेथे अस्वस्थ वाटू लागल्याने ते रात्री ११ वाजेच्या सुमारास औषधोपचारासाठी आपल्या दवाखान्यात गेले. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षक भवारी यांनी सांगितले. दरम्यान मयत डॉक्टर भामरे यांच्या गळ्यात सोन्याची चैन व हातातील अंगठी घटनास्थळी मिळून आली.डॉ. मनोज भामरे रात्री घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पहाटे चार वाजेपर्यंत त्यांची वाट बघितली. त्यानंतर त्यांचा शोध घेत दवाखान्यात आले असता दवाखान्याचा दरवाजा उघडा होता. आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत दिसून आले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान डॉ. भामरे यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राजेंद्र भामरे यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. डॉ. भामरे यांच्या डोक्याला जखम झाली असून घटनास्थळी रक्त पडलेले होते. रोटरीचा कार्यक्रम झाल्यानंतर बैठक संपताच ते घरी येत. मात्र ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. डॉ. भामरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.दरम्यान या प्रकरणी कॅम्प पेलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मोहिते करीत आहेत.नातलगांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितल्याचे पोलीस निरीक्षक भवारी यांनी सांगितले. मात्र कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.