मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसासमोर असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचा सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच्या डोक्यावर जखमा आढळून आल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.मोहम्मद साबीर मोहम्मद यासिन याने याबाबत पवारवाडी पोलिसांत माहिती दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख सलिम शेख मुसा (४२, रा. रहेमताबाद पाटकिनारा) हे दोन्ही पायांनी अपंग असून आपल्या बारा वर्षीय शेख अरसलान यास सोबत घेऊन मिळेल ते काम व रिक्षा चालवून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत होते. शनिवारी सायंकाळी रिक्षास लांब पल्ल्याचे भाडे मिळाल्याने त्यांनी अरसलानला घरी पाठवून दिले. परंतु रात्री घरी परत आले असता मुलगा घरी आलाच नसल्याचे समोर आले. बांधकाम मजुरांकडून खबर सोमवारी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसा समोर खालीद अब्दुल हमीद यांच्या अपूर्णावस्थेत असलेल्या इमारतीचे बांधकाम रमजान ईद निमित्ताने आठवडाभरापासून बंद होते. सोमवारी सकाळी पूर्ववत कामास सुरुवात झाली असता कामावर आलेल्या मजुरांना पहिल्या मजल्यावर एक अल्पवयीन मुलागा मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती मालकास दिली. घटनास्थळी पवारवाडी पोलिसांनी धाव घेऊन कायदेशीर कारवाई करीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
मालेगावी अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 2:19 AM
मालेगाव हरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसासमोर असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचा सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच्या डोक्यावर जखमा आढळून आल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देघातपाताचा संशय : अपहरणाची होती तक्रार