मोहम्मद साबीर मोहम्मद यासिन याने याबाबत पवारवाडी पोलिसांत माहिती दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख सलिम शेख मुसा (४२, रा. रहेमताबाद पाटकिनारा) हे दोन्ही पायांनी अपंग असून आपल्या बारा वर्षीय शेख अरसलान यास सोबत घेऊन मिळेल ते काम व रिक्षा चालवून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत होते. शनिवारी सायंकाळी रिक्षास लांब पल्ल्याचे भाडे मिळाल्याने त्यांनी अरसलानला घरी पाठवून दिले. परंतु रात्री घरी परत आले असता मुलगा घरी आलाच नसल्याचे समोर आले. शेख सलीम यांनी मित्रांच्या मदतीने त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची तक्रार आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
इन्फो
बांधकाम मजुरांकडून खबर
सोमवारी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसा समोर खालीद अब्दुल हमीद यांच्या अपूर्णावस्थेत असलेल्या इमारतीचे बांधकाम रमजान ईद निमित्ताने आठवडाभरापासून बंद होते. सोमवारी सकाळी पूर्ववत कामास सुरुवात झाली असता कामावर आलेल्या मजुरांना पहिल्या मजल्यावर एक अल्पवयीन मुलागा मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती मालकास दिली. घटनास्थळी पवारवाडी पोलिसांनी धाव घेऊन कायदेशीर कारवाई करीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
इन्फो
दोषींवर कारवाईची मागणी
घटनेची माहिती मिळताच आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख यांनी सामान्य रुग्णालय गाठून मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करीत अधिक तपास सुरू केला आहे.