शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सावरगावच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:40 AM

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी राजेंद्र जाधव (४०) यांनी कर्ज व घरखर्च भागत नसल्याने राहत्या घरी मध्यरात्री घराच्या छतास गळफास बांधत आत्महत्या केली. सकाळ झाली पती अजून उठत नाही म्हणून पत्नी उठविण्यासाठी गेली असता त्यांनी फाशी घेतल्याचे लक्षात आले. ही वार्ता गावात पसरताच राजूच्या घराकडे ग्रामस्थांनी धाव ...

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी राजेंद्र जाधव (४०) यांनी कर्ज व घरखर्च भागत नसल्याने राहत्या घरी मध्यरात्री घराच्या छतास गळफास बांधत आत्महत्या केली. सकाळ झाली पती अजून उठत नाही म्हणून पत्नी उठविण्यासाठी गेली असता त्यांनी फाशी घेतल्याचे लक्षात आले. ही वार्ता गावात पसरताच राजूच्या घराकडे ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलीसपाटील सोमनाथ शेलार यांनी नांदगाव पोलिसांना देताच नांदगाव पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव येथे पाठविण्यात आला. राजेंद्र जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमविता तरु ण गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळावू स्वभाव असलेल्या राजेंद्रच्या जाण्याने संपूर्ण गाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. शनिवारी दु.२ वाजता सावरगाव येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिक