सिन्नर : तालुक्यातील भाटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णा बाळासाहेब खर्जे, तर उपसरपंचपदी मनोज निवृत्ती महात्मे यांची बिनविरोध निवड झाली.ग्रामपंचायत सदस्यांची पंचवार्षिक निवडणूक गत महिन्यात पार पडली होती. निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंचपदासाठी सुवर्णा खर्जे यांनी दाखल केलेल्या अर्जावर सूचक म्हणून श्वेता नितीन पाचोरे, तर उपसरपंचपदासाठी मनोज महात्मे यांनी दाखल केलेल्या अर्जावर अर्चना श्याम लोंढे यांची स्वाक्षरी होती.अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सरपंचपदी खर्जे, तर उपसरपंचपदी मनोज महात्मे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गाडे यांनी जाहीर केले. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर खर्जे, नामदेव जाधव, द्रौपदी डगळे, बाळासाहेब खर्जे, गोरख पाचोरे, चंद्रकांत बलक, नितीन पाचोरे, राजेंद्र महात्मे, किरण बलक, श्याम लोंढे, जगन लोंढे, विकास महात्मे, माजी सरपंच संजय खर्जे, अर्जुन खर्जे, अतुल पाचोरे, बहिरू पाचोरे, विष्णू लोंढे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
भाटवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा खर्जे बिनविरोध
By admin | Published: February 20, 2016 9:35 PM