येवला : केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांच्या राज्यघटनेसंदर्भात वापरलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले.केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांनी कर्नाटक मधील कोप्पल जिल्ह्यात ब्राह्मण युवा परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्र मात ‘आम्ही भारतीय राज्य घटना बदलण्यासाठी आलेलो आहोत व पुढील काही दिवसात घटना बदलण्यात येईल’ असे बेजाबदार वक्तव्य केल्याचा आरोप येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. असे वक्तव्य करून घटनेचा तसेच धर्मनिरपेक्ष विचारांवर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर प्रश्न उपस्थित केला आहे.त्यामुळे संसदेमध्ये अससंदीय भाषा वापरणाºया केंद्रीय मंत्री आनंद कुमार हेगडे यांना संसदेमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. त्यांनी तत्काळ खासदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व जनतेची माफी मागावी यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राजीनामा न दिल्यास विंचूर चौफुली येथे रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.या धरणे आंदोलनात स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, कार्याध्यक्ष विजय घोडेराव, सचिव शशिकांत जगताप, शहराध्यक्ष अजरभाई शेख, हमजा मंसूरी, अजीज भाई शेख, आकाश घोडेराव, सागर गरुड, नवनाथ पगारे, रेखा साबळे, शोभा उबाळे, आशा आहेर, शीतल आहेर, रंजना पठारे, कांताबाई गरु ड, रेखा पगारे, संगीता आहिरे आदि सह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:34 AM
येवला : केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांच्या राज्यघटनेसंदर्भात वापरलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देतहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनराज्यघटनेसंदर्भात वापरलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध