नाशिक : जागतिक अपंगदिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणा:या स्वावलंबन कार्डसाठी (यूआयडी) नोंदणी ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस परिसरात करण्यात आली. या स्वावलंबन कार्ड नोंदणी अभियानात सुमारे 350 दिव्यांगांनी सहभाही होऊन त्यांनी नोंदणी केली. यावेळी ‘दिव्यांग अधिकार कायदा 2016’ विषयी दिव्यांगांना माहिती देण्यात आली. दिव्याग अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांगांसाठी विशेष तरतुदी करण्यात आली असून, या दिव्यांगांनी स्वावलंबनासाठी या तरतुदींचा व सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन अपंग क्रांती आंदोलनचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद यांनी केले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध शासकीय नोकऱ्यामध्ये 3 टक्के आरक्षणानुसार दिव्यांगाची नियुक्ती करून दिव्यांगाना स्वावलंबनासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांसाठी महानगरपालिके च्या विविध योजनांसह सरकारच्या अर्थसाहाय्य योजना व बचतगटांसह विविध सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बबलू मिङर यांनी दिव्यांगांना दिली. याप्रसंगी प्रहार संघटनेचे सुनील पवार, विजय पाटील, मनोज कोकरे, महेश आरणे, भारत गुंजाळ विशाल होनमाने आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी अपंगांच्या सोयी सुविधा आणि रिक्त जागांवरील भरतीच्या प्रश्नावर आमदार बच्चू कड्डू यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्त आणि कडू यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर अपंगाच्या समस्यांचा मुद्दा एेरणीवर आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनाही एकवट्ल्या असून रविवारी जागतिक अपंग दिनाच्या पाश्वर्भूमिवर प्रहार अपंग क्रांती आंदोलन व दिव्यांग कल्याणकारी संघटनेने संयुक्त उपक्रम राबवून जवळपास 350 दिव्यांगांची स्वावलंबन कार्डसाठी नोंदणी करवून घेतली.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन, दिव्यांग कल्याणकारी संघटनेचा संयुक्त उपक्रमातून 350 दिव्यांगांनी केली स्वावलंबन कार्डची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 5:41 PM
जागतिक अपंगदिनानिमित्त प्रहार अपंग क्रांती आंदोलन नाशिक व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्यातर्फे दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणा:या स्वावलंबन कार्डसाठी (यूआयडी) नोंदणी ठक्कर बाजार येथील नवीन सीबीएस परिसरात करण्यात आली.
ठळक मुद्देदिव्यांग अधिकार कायदा 2016 विषयी दिव्यांगांची जागृतीस्वावलंबन कार्ड नोंदणीत 350 दिव्यांगांचा सहभाग स्वावलंबनासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी