मालेगाव : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे आगमन मालेगावी आयएमए हॉल येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता होणार आहे. सायंकाळी ५ वाजता संगमेश्वरातील दत्तमंदिर येथून पालखीची मिरवणूक निघणार असून, मोसमपूल, श्रीरामनगर, एकात्मता चौक, मोची कॉर्नर, रावळगाव नाका, हेरंब गणेश मंदिर, मारवाडी गल्लीमार्गे मोची कॉर्नर येथे मिरवणुकीचा समारोप होईल. शनिवारी सकाळी६ वाजता अभिषेकानंतर पालखी धुळ्याकडे मार्गस्थ होईल.
स्वामी समर्थ पालखीचे आज मालेगावी आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:20 AM