नाशिक : स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्माविषयी विचारधारेचे सूत्र समान असून, या दोन्ही विचारवंतांचे राष्ट ्रचिंतन, समाज चिंतन, धर्म चिंतन, अर्थ चिंतन, शिक्षण चिंतन, स्त्रीविषयक दृष्टिकोन याविषयीचे वैचारिक सूत्र एकसारखेच असल्याचे प्रतिपादन प्राचार्य श्याम अत्रे यांनी केले. शंकराचार्य न्यासच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे व्याखानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर स्वामी विवेकानंद केंद्राच्या नाशिक शाखेचे संचालक बाळासाहेब मगर व शंकाराचार्य न्यासचे राजेंद्र मोगल उपस्थित होते. अत्रे म्हणाले, धर्म किंवा धर्मवादी विचारसरणीला केंद्रबिंदू मानून तुलनात्मकदृष्ट्या विषयाची मांडणी करताना आंबेडकर व विवेकानंद यांनी धर्म सुधारणा, समाज सुधारणा व राजकीय सुधारणेची गरज अधोरेखित केली असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर ढोंगीपणा नको अशी भूमिका मांडली आहे, तर स्वामी विवेकानंद यांनी धर्मातील उच्चवर्णीय आणि सर्वसामन्यांतील भेदभाव दर्शवून देताना त्यातील विरोधाभास अधोरेखित केला असल्याचे मत अत्रे यांनी मांडले. धर्मविषयी बोलताना अत्रे यांनी वेळोवेळी धर्म आचार्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले नसल्याची खंत व्यक्त केली. सूत्रसंचालन अश्विनी अहिरे यांनी केले, अंकिता मराठे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद, आंबेडकर विचारधारेचे समान सूत्र
By admin | Published: January 23, 2017 12:15 AM