नाशिक : ऐतिहासिक ठरलेल्या शिकागोतील सर्व धर्मपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी ओळखपत्राची पूर्तता करणे आवश्यक असल्याची माहिती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांना नव्हती. मर्यादित साधनांची उपलब्धता असताना स्वामी विवेकानंद यांचा शिकागो सर्वधर्म परिषदेत पोहोचण्याचा प्रवास आणि संघर्ष थक्क करणारा आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले.अखिल भारतीय ब्राह्मण संस्थेच्या सभागृहात उल्हास रत्नपारखी यांचे ‘अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहेचले’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. अमेरिकेच्या शिकागो शहरात ११ सप्टेंबर १८८३ रोजी झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातून जगाला भारताची ओळख झाली. मात्र या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंद यांना अनेक अडचणी आणि अडथळे पार करावे लागले. यामागे मोठी विलक्षण अशी कथा आहे. विवेकानंद यांच्या कार्याची भुरळ पडलेल्या मेरी लुईसबर्ग या अमेरिकेच्या महिलेने स्वामीजी ज्या ठिकाणी गेले, त्याठिकाणी जाऊन त्यांनी माहितीचे संकलन करून अनेक ग्रंथांचे खंड प्रकाशित केले.स्वामीजींना स्वत:चा आध्यात्मिक विकास साधायचा होता, परंतु त्यांचे जीवन कार्यासाठी भौगोलिक सीमाही अपुऱ्या असल्याचे परमहंस यांनी सांगितले. या जाणिवेतून स्वामीजींनी विश्वकल्याणाची मिळाली दृष्टी मिळाली असेही ते म्हणाले. विभागीय महाप्रबंधक अशोक कुलकर्णी यांनी रत्नपारखी यांचा सत्कार केला.
स्वामी विवेकानंदांचा संघर्ष थक्क करणारा : रत्नपारखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:14 AM