नाशिक : स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्नील लोणकर (२४)या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे स्वप्निलची आत्महत्या म्हणजे व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचा आरोप छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला अशून हुतात्मा स्मारक येथे संघटनेच्या कात्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि.४) शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. प्रशासनात रिक्त पदे असूनही कमी जागांच्या जाहिराती आणि त्याही वेळेवर निघत नाहीत. त्या निघाल्यानंतर ठरलेल्या वेळी परीक्षा होत नाहीत. आणि परीक्षा झाल्याच तरी वर्षानुवर्षे निकाल नाहीत. इतके सगळे दिव्य पार पाडून परीक्षा पास झाल्यानंतरही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने परीक्षार्थींचे मोठे नूकसान होत असल्याचे मत छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. छात्रभारतीचे राज्याध्यक्ष राकेश पवार यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला. तसेच नोकर भरती झालीच पाहिजे अशा घोषणाही दिल्या.
स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे व्यवस्थेनने घेतलेला बळी ; छात्रभारतीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:21 PM
पुणे येथे स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्नील लोणकर (२४)या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली नाशिकमध्ये छात्रभारती विद्यार्थी संघटनेने हुतात्मा स्मारक येथे जोरदार निदर्शने करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
ठळक मुद्देछात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून सरकारचा निषेधहुतात्मा स्मारक येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांची निदर्शनेस्वप्नील लोणकरचा व्यवस्थेने बळी घेतल्याचा आरोप