नाशिक : स्वातंत्र्य चळवळीतील जहाल नेते लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन करण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची वेशभूषा केली होती़ यानिमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आली़ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़नाशिकरोड देवी चौक येथे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त ब्लॉक काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ यावेळी दिनेश निकाळे, कामिल इनामदार, कुसुम चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अरुणा आहेर, प्रकाश चंदनसे, विनायक बत्तीसे, दशरथ साळवे, सिध्दार्थ गांगुर्डे, लीलाबाई गायकवाड आदी उपस्थित होते़आदर्श विद्यालयनाशिक : बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली़ माध्यमिक शालांत परीक्षेचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. यावर्षी यशाची उज्ज्वल परंपरा अखंडित ठेवत ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान चैत्राली गायधनी हिने पटकावला. द्वितीय क्र मांक सोहम कुलकर्णी, तर तृतीय क्रमांक कार्तिकी खरे हिचा आला. विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाशिक महानगरपालिका शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्र मास संस्थेचे अध्यक्ष विनोद कपूर, उपाध्यक्ष व्ही. एच. पाटील तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त उदय कुलकर्णी, विश्वस्त मोना मदान, मुख्याध्यापक संध्या भातखंडे उपमुख्याध्यापक वाळुंजे सर, पर्यवेक्षक ठोके मॅडम उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन रोहिणी बागुल यांनी केले.आदर्श व अभिनव शाळानाशिक : मविप्र समाजाचे आदर्श व अभिनव बालविकास मंदिर या शाळेत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी व ज्येष्ठ शिक्षिका अर्चना वाळके, शोभा पाटील, जयश्री कुयटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी टिळकांच्या वेशभूषेत आले होते. काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गावले यांनी केले, तर आभारप्रदर्शन हर्षाली पवार यांनी केले.मनपा शाळा क्र. ७७मनपा शाळा क्र. ७७, अंबड शाळेत मुख्याध्यापक विजय कवर यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रम संपन्न झाला. संजय सानप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सुनील बोंडे व विजय कवर यांनी विद्यार्थ्यांना टिळकांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी नीलिमा फलके, राजाराम चौरे, मंगला सोनवणे, चंद्रकला बागुल, रूपाली चव्हाण, सुनील सोनवणे, वैशाली क्षीरसागर, अर्चना बोंडे, भारती गवळी, मीनाक्षी सोनार आदी उपस्थित होते.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे़़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:38 AM