यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक तालुका स्तरावर जलद गतीने न्यायालयाची स्थापना व्हावी, पोस्को कायद्यात असणारी शिक्षा अधिक कठोर करण्यात यावी, पीडित महिला कुटूंबाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे, पोलिसांनी महिलांच्या तक्र ारी दखल करून व योग्य चौकशी करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, प्रत्येक पोलीस स्टेशनला आॅनलाइन तक्र ार निवारण केंद्र सुरू करावे, गर्दीच्या व कॉलेजच्या ठिकाणी निर्भया पथक नेमण्यात यावे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, बाळू आहिरे, विनोद त्रिभवन, सागर गरु ड, संतोष गायकवाड, वसंत पवार, महीला आघाडीच्या आशा आहेर, ज्योती पगारे, वाल्हुबाई जगताप, कमळाबाई खैरणार, उषा पगारे, पार्बताबाई पगारे ,अलका घोडेराव यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.(18येवला स्वारीप)