येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विंचूर चौफुली वरील पुतळ्याचे व स्मारकाचे सुशोभीकरण करा, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजता शहरातील विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणापूर्वी स्वारिपच्या वतीने नगरपालिका, तहसिल कार्यालय यांना या मागणीबाबत वेळोवेळी निवेदनही देण्यात आली होती. पालिकेने सुशोभीकरणासह स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत अश्वासन दिले होते परंतु ते पाळले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे व स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचेही पगारे यांनी स्पष्ट केले.
पगारे यांचे उपोषणास पाठिंबा म्हणून विनोद त्रिभुवन, नवनाथ पगारे, बाळू आहिरे, गणेश जाधव, महेंद्र खळे, विजू पगारे, नाना पिंपळे, वसंत घोडेराव, विजय घोडेराव, अशा आहेर, नंदिनी पगारे, उषा पगारे, पार्वताबाई पगारे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, उपोषणस्थळी भेटी देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला.
दरम्यान, पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, अभियंता जनार्दन फुलारी, शहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी आदींनी पगारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
(०६ येवला आंदोलन)
060721\06nsk_41_06072021_13.jpg
०६ येवला आंदोलन